Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.. - अधिकृत...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.. – अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.)प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील गडचिरोली,अहेरी,एटापल्ली,भामरागड, धानोरा, कुरखेडा,चामोर्शी,सिरोंचा,देसाईगंज (वडसा) आणि आरमोरी या सर्व तालुक्यांतील आय.टी.आय.संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जात आहे.यामध्ये आरेखक,स्थापत्य,इलेक्ट्रीशियन,फिटर, वेल्डर, वायरमन, कोपा,मेकॅनिक मोटर वाहन,ड्रेस मेकिंग,डाटा एंट्री ऑपरेटर इत्यादी रोजगाराभिमुख कोर्सचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण,तर काही कोर्ससाठी ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्रता आहे.इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत,असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र,आधार कार्ड,पासपोर्ट साइज फोटो,जात प्रमाणपत्र (लागल्यास) इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.प्रवेश घेतल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांद्वारे अप्रेंटिसशिप,नोकरी मेळावे व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.अधिक माहितीसाठी स्थानिक आय.टी.आय. कार्यालयाशी किंवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा.तसेच इच्छुकांनी प्रवेशासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा,असे आवाहन गडचिरोली आय.टी.आय.चे प्राचार्य एस.एस.चौधरी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!