Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपुढील दोन दिवसात धो-धो बरसणार पाऊस..

पुढील दोन दिवसात धो-धो बरसणार पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस येत्या दोन दिवसांत राज्यात धो-धो बरसणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.आज,गुरुवार १२ जून रोजी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे अलर्ट हवामान विभागाने जारी केले आहे. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यास आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यातच कोल्हापूर, सांगली,रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच विदर्भातील वाशिम, अकोला,अमरावती,यवतमाळ,वर्धा,नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान केंद्रानुसार,नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा गाठला आहे.आता मान्सून पूर्वेकडील भागात सरकत आहे.पुढील ४८ तासांत विदर्भ,छत्तीसगड,ओडिसा या भागात मान्सून व्यापला जाणार आहे.बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटक,छत्तीसगड,महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!