Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकरी अपघात विमा योजेअंतर्गत मिळतात दोन लाख रुपये.. - अपघात,संपदर्श,नैसर्गिक आपत्तीत मृत्यू...

शेतकरी अपघात विमा योजेअंतर्गत मिळतात दोन लाख रुपये.. – अपघात,संपदर्श,नैसर्गिक आपत्तीत मृत्यू व इतरांना मिळतो लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेती व्यवसाय करीत असतांना बऱ्याच कारणांनी शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अंपगत्व ओढावते.घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊन अडचण निर्माण होते.म्हणून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळत आहे.शेतात काम करीत असतांना होणारे अपघात, संपदर्श,नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे मृत्यू,रस्ता अपघात,वाहन अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन लाख रुपये,एक हात व एक पाय असे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख,एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत मिळत असते.राज्यातील सर्व शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील,शेतकऱ्याची पती/पत्नी,मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!