Sunday, August 9, 2026
Homeनागपूरमजुरीचे पैसे डबल करण्याच्या नादात जुगारात हरला आणि आयुष्याची दोरच कापली..

मजुरीचे पैसे डबल करण्याच्या नादात जुगारात हरला आणि आयुष्याची दोरच कापली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आई व मुलाने हप्ताभर काम केले.हप्ताभर काम केल्यानंतर दोघांनाही रविवारी मजुरीचे पैसे मिळाले.पैसे मुलाकडेच असल्याने त्याने डबल करण्याचा विचार केला.त्यानुसार तो जुगार खेळण्यासाठी एका अड्ड्यावर गेला.अश्यातच मोल मजुरी करून कमविलेली संपूर्ण रक्कम त्याने जुगारात गमावली. त्यातच तो तणावात गेला आणि आयुष्याची दोराच कापली.शुभम अशोक बोबडे वय २६ वर्षे,रा. पोटा,ता.सावनेर,जि.नागपूर असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सदरची घटना सावनेर तालुक्याच्या खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोटा गावात काल सोमवारी सायंकाळच्या
सुमारास उघडकीस आली.
माहितीनुसार,घटनेच्या दिवशी शुभमची आई सावनेरला गेली होती,तर वडील बकऱ्या चरण्यासाठी बाहेर गेले होते.शुभम व त्याची आई मजुरीचे काम करतात.रविवारी त्यांना मजुरीची रक्कम मिळाली होती.दोघांच्या मजुरीची रक्कम शुभमकडेच होती.त्यामुळे तो तालुक्यातीलच सिल्लेवाडा येथील वेकोलि गार्डनजवळ असलेल्या झुडपात पैसे डबल करण्यासाठी जुगार खेळायला गेला होता.जुगारात संपूर्ण रक्कम हरल्याने तो तणावात होता.याच तणावात त्याने राहत्या घरी छताला दुपट्टयाच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सायंकाळी आई,वडील घरी आल्यावर त्यांना शुभम लटकलेल्या अवस्थेत दिसला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.घटने प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!