Saturday, June 20, 2026
Homeगोंदियारेल्वे स्टेशनवर भांडण; तितक्यातच ट्रेनचे आगमन.. - रागाच्या भरात शिक्षकाने ट्रेनसमोरच मारली...

रेल्वे स्टेशनवर भांडण; तितक्यातच ट्रेनचे आगमन.. – रागाच्या भरात शिक्षकाने ट्रेनसमोरच मारली उडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-काळीज हेलावणारी घटना पत्नी आणि मुलीच्या डोळ्यादेखत घडल्याने घटनेने सर्वजण अवाक् राहिले.गावी जाण्यासाठी निघालेले,ट्रेनची वाट पाहत होते.अश्यातच काही कारणावरून पती-पत्नीत वाद झाला.वादाचे अवसान इतके भयावह होणार याची कल्पनाही पत्नीने केली नसावी आणि तेच झाले. वादामुळे संतापलेल्या पेशाने शिक्षक असलेल्या पतीने अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेनच्या  इंजिनसमोर उडी मारल्याने शिक्षकाचे जागीच दोन तुकडे झाले.सदरची घटना काल,रविवार १ जून रोजी सायंकाळी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर घडली.तुलसीदास पराते,असे ट्रेन समोर उडी मारलेल्या शिक्षकाचे नाव आहे.मयत शिक्षक हा
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
विदिशा येथे शिक्षक म्हणून काम करणारे तुलसीदास हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह आमगावला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील कारंजा गावात आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर,ते काल रविवारी संध्याकाळी ६ वाजता घरी परतण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह आमगाव स्टेशनवर पोहोचले.दरम्यान,घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होते.यावेळी पती-पत्नीमध्ये भांडण झाले.रागामुळे दोघांमधील तणाव वाढतच गेला.यामुळे संतापलेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनसमोर उडी मारून आत्महत्या केली.घटनेनंतर पत्नी आणि मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांची गर्दी जमली.रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते.या घटनेची माहिती मिळताच आमगाव रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले व पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव रुग्णालयात पाठवण्यात आला.प्रकरणी पोलिसांनी  अपघाती मृत्यूची नोंद केली.क्षुल्लकसे कारण हे मानवाला किती हानिकारक आहे; हे सदरच्या प्रकरणावरून नजरेस पडते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!