उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका सुरू झाला आणि राजकारणाचे समीकरण बदलले.सुरुवातीला सर्वच महिलांनी योजनेचा लाभ घेतला.त्यानुसार आता पर्यंत पात्र लाभार्थींच्या खात्यात १३ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अश्यातच आता लाभार्थी महिलांच्या अर्जांची फेर पडताळणी करण्यात येत आहे,ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे,त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.अनेक महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असतांना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असतांना देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अश्या महिलांची नावे योजनेतून वगळण्यात येत आहेत.धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता पुढे आली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते.या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २ हजार २८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून,यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे.असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आता ‘या’ लाडक्या बहिणींचे अर्ज होणार बाद; दीड हजार बंद..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

