- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आत्ताच्या वातावरणीय बदलाचे काही खरे नाही.झटक्यातच कडक ऊन तापू लागते,तर काही वेळातच काळोख पसरून आभाळ फाटू लागतो. त्यातच उन्हाळ्याचा पावसाळा तर पावसाळ्याचा उन्हाळा झाल्यासारखे वाटते.अश्यातच आता ऐन उन्हाळ्यातच अवकाळी पाऊस कोसळून ऊन पावसाचा जोर कायम आहे.अवकाळी पडणाऱ्या पावसात विजांचे कडकडाटांनी भर घातली आहे.शेतात वा इतर ठिकाणी कामे करीत असतांनाच अचानकपणे पाऊस हजेरी लावतो आणि एखाद्याचा बळी घेऊन निघून जातो.असाच प्रकार काल, सोमवारी लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात दुपारच्या सुमारास उघडकीस आला होता.आठ मजूर शेतातील मान्सून पूर्व मशागतीची व इतर कामे करीत असतांनाच अचानकपणे पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आठही मजूर शिवारातील एका झाडाच्या आडोशाला गेले असता झाडावर वीज कोसळली.यात झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.त्यातच नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील बाबदेव येथील निवासी तरुण शेतकऱ्याचा विजांच्या थयथयाटात सापडून बळी गेला.मनोज चिंधु वंजारी वय ३० वर्षे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.अरोली गावात त्यांची शेती आहे.काल सोमवारी त्यांच्या शेतात नांगरणी सुरू होती.दुपारी ४ वाजतादरम्यान वातावरणाचे चित्र बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. मनोज झाडाखाली ठेवलेल्या ट्रॅक्टरवर बसला होता.विजांच्या गर्जनाने खाली उतरत असतांनाच झाडावर वीज कोसळली व त्यात मनोज वंजारी मृत्युमुखी पडला.मनोजला पत्नी,दोन वर्षाची मुलगी व आई वडील आहेत.कर्त्या तरुण मुलाच्या मृत्युने कुटुंबावर संकट कोसळले आहे.
सहसा वीज ही झाडावर कोसळत असल्याचे घडलेल्या घटनांवर लक्षात येते.त्यामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यास झाडाचा आसरा न घेता एखाद्या सुरक्षित स्थळी थांबावे.
- Advertisement -

