गोंदिया :-पोलीस भरतीची तयारी करणारे दोघेजण आंघोळीसाठी नदीत उतरले असता खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल,रविवारी २५ मे च्या सकाळी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला, मानेकसा बाघनदी परिसरात उघडकीस आली. कृष्णकुमार हेतराम पारधी वय १९ वर्षे व शुभम भीमराव कांबळे वय २० वर्षे अशी मृतांची नावे असून दोघेही आमगाव तालुक्यातील कालीमाटी गावातील रहिवासी होते.माहितीनुसार,पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण सकाळच्या सुमारास धावण्यासाठी(रणींग) गेले होते. यात कृष्णकुमार,शुभम व त्यांचा मित्र रवी टेंभरे हे तिघेही धावून झाल्यानंतर काहीकाळ विश्रांती घेत बसले होते.त्यानंतर कृष्णकुमार व शुभम हे दोघे बाघ नदीतील मानेडोह परिसरात आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले.पाण्यात उतरताच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडू लागले.अशातच जवळच असलेला मित्र रवी टेंभरे घाबरला व त्याने घटनेची माहिती गावकऱ्यांना मोबाईलद्वारे दिली.त्यानंतर गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मच्छिमार आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.दोघेही पोलीस भरतीची तयारी करीत होते.त्यांनी लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र,पोलिस गणवेश परिधान करण्याच्या पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.
पोलिस गणवेश परिधान करण्याचे स्वप्न राहिले अधुरे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

