Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क- सर्वोच्च न्यायालय - शिक्षिका महिलेची नाकारलेली प्रसूती...

मातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क- सर्वोच्च न्यायालय – शिक्षिका महिलेची नाकारलेली प्रसूती रजा रद्दबातल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय धोरणानुसार,दोन अपत्यानंतर प्रसूतीसाठी रजा मंजूर करता येत नाही,असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने या शिक्षिका महिलेची प्रसूती रजा नाकारली होती.परंतु महिलेचे तिसरे अपत्य हे दुसऱ्या लग्नातून झालेले आहे; असे सांगत सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला.मातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क आहे.यामध्ये महिलांना जगण्याचा अधिकार,आरोग्य,प्रतिष्ठा मिळते,असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.महिला कर्मचाऱ्यांना नोकरी करत असतांना मिळणारी प्रसूतीची रजा हा केवळ सामाजिक न्यायाचा विषय राहिला नसून तो कर्मचाऱ्यांना संविधानाने दिलेला हक्क आहे.अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करतांना निर्वाळा दिला.मद्रास उच्च न्यायालयाने एका सरकारी शिक्षिकेला तिच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी प्रसूती रजा नाकारण्याचा आदेश क़ोर्टाने धुडकावला.न्यायाधीश अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला.महिला कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक न्यायाची भूमिका ठेवणे,त्यांची ऊर्जेची भरपाई करणे,बाळाचे पालनपोषण करणे आणि त्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर पुन्हा आधीसारखी कार्यक्षमतेची पातळी राखणे हा प्रसूती रजेमागील उद्देश आहे.हा केवळ मातृत्वाचा विषय नसून नवजात बाळाकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते,असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!