- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नुकतेच बनावट शालार्थ आयडी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणी खोलवर रुजलेली पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाचे गठण करण्यात आले आहे.त्यानुसार पथकाच्या माध्यमातून आता एकेकाची कसून चौकशी करण्यात येत असल्याने घोटाळ्यात नवनवीन पोपट पिंजऱ्यात अडकू लागले आहेत.आता घोटाळ्यात राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी याला अटक करण्यात आली आहे.काल रात्रीपर्यंत त्याचे स्टेटमेंट घेण्यात आले.सदरच्या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी प्रत्यक्ष बोगस शालार्थ आयडी बनविणारा शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक लक्ष्मण उपासराव मंघाम वय ४७ वर्षे,वासंती अपार्टमेंट, आकांशी ले-आउट,दाभा,याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्याच्या चौकशीतून वंजारी याचे नाव समोर आले.वंजारी याचे नाव अगोदरच्या आरोपींच्या चौकशीतदेखील समोर आले होते.२०१९ पासून हा गोरखधंदा सुरू असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.वंजारी शिक्षणाधिकारी असतांनाच बनावट शालार्थ आयडींना मंजुरी देण्यात आली होती. भरती प्रक्रिया बंद असतांनादेखील ही मंजुरी देण्यात आली व या बाबी संगनमताने लपवून ठेवण्यात आल्या होत्या.सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने वंजारी याला ताब्यात घेतले आहे.त्यामुळे आणखी कोणता नवा पोपट पिंजऱ्यात अडकतोय,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
- Advertisement -

