Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीनक्षल्यांकडून जवानांवर अंदाधुंद गोळीबार; प्रत्युत्तरात ४ नक्षलवादी ठार..

नक्षल्यांकडून जवानांवर अंदाधुंद गोळीबार; प्रत्युत्तरात ४ नक्षलवादी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस ठाण्याजवळ नक्षलवादी घातपात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.त्यानुसार नक्षलविरोधी अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या ३०० जवानांचे विशेष पथक व केंद्रीय राखीव दलाच्या पथकाने
आज,शुक्रवार २३ मे रोजी सकाळच्या सुमारास कवंडे आणि नेलगुंडा येथील इंद्रावती नदी काठ व जंगल परिसरात शोधमोहीम राबवली.दरम्यान,नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला असता सी-६० च्या जवानांनी जश्यास-तसे प्रत्युत्तर देत तब्बल दोन तासाच्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांना सळो की,पळो करून सोडले.अश्यातच चकमकीनंतर परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत ४ जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह,एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR),दोन ३०३ रायफल आणि एक भरमार बंदूक,वॉकी टॉकी,छावणी साहित्य व इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले असून परिसरात आणखी शोध मोहीम सुरू आहे.त्यामुळे ठार झालेल्या नक्षलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!