Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरगैरमार्गाचा वापर; धार्मिक स्थळांजवळ क्यूआर कोड लावून देणगी जमा करणाऱ्याचा भांडाफोड.. ...

गैरमार्गाचा वापर; धार्मिक स्थळांजवळ क्यूआर कोड लावून देणगी जमा करणाऱ्याचा भांडाफोड.. – खात्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून ६५ लाखांहून अधिक रक्कम जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काही धार्मिक स्थळी भक्तगण परमेश्वराने आपली मनोकामना पूर्ण करावी वा पूर्णी केली म्हणून मोठ्या प्रमाणावर संस्थांना देणग्या देत असतात.मात्र, काहीजण देणग्या मिळतात म्हणून गैरमार्गांचा वापर करू लागलेत.असाच प्रकार आतंकवाद विरोध पथकाच्या (Anti-Terrorism Squad)एका कर्मचाऱ्याने हाणून पाडला आहे.एका इसमाने चक्क धार्मिक स्थळांजवळ क्यूआर कोड लावून देणगी जमा करण्याचा सपाटा चालवला होता.धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात पैसे वळवले जात होते. आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून ६५ लाखांहून अधिक रक्कम आली होती.याप्रकरणी कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता कां? याचा तपास सुरू आहे.
मोहम्मद एजाज अन्सारी मोहम्मद मुस्तकीन अन्सारी (नारी रोड,कामगार नगर,नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.तो जेरे अहतमाम दारुल उलूम गौसिया इंजेजामिया या संस्थेचा सदस्य आहे.संबंधित संस्था नोंदणीकृत आहे.अश्यातच आरोपीने संस्थेच्या नावाने क्यूआर कोड बनविले होते व ते विविध ठिकाणी लावले होते.संबंधित बॅनरवर एका निर्माणाधीन इमारतीचे चित्रदेखील होते.या कोडच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात देणगी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.एटीएसच्या नागपूर युनिटमधील एका कर्मचाऱ्याला शंका आली व त्याने ५० रुपये क्यूआर कोड स्कॅन करून पाठविले. संबंधित रक्कम ही संस्थेच्या खात्यावर जमा न होता स्टार कॉम्प्युटर सोल्युशन्सच्या खात्यावर जमा झाली. संबंधित कंपनी ही आरोपीचीच आहे.संबंधित बँक खात्याची तपासणी केली असता त्यात मागील दोन वर्षात ६८.५९ लाख रुपये हे विविध संस्था व वेगवेगळ्या खात्यांतून जमा झाल्याचे दिसून आले.हा गैरप्रकार समोर आल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी अन्सारीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१४,३१६ व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अन्सारीच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम कुठून आली याचा तपास सुरू आहे.या पैशांचा उपयोग देशविघातक कृत्यांसाठी केला जात होता किंवा यातून मनी लाँडरिंग सुरू होते काय? याची सुद्धा चौकशी सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!