Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर तात्पुरते स्थगित झालेले आयपीएलचे सामने आजपासून सुरू; पहा वेळापत्रक..

अखेर तात्पुरते स्थगित झालेले आयपीएलचे सामने आजपासून सुरू; पहा वेळापत्रक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएल २०२५ अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले होते. आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे होणार होता,परंतु देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तो रद्द करण्यात आला.देशात युद्ध सुरू असतांना आपण क्रिकेट खेळत राहणे चांगले वाटत नाही.याचा अर्थ असा की,देशाची सुरक्षा खेळांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना शुक्रवार ९ मे रोजी एकाना स्टेडियमवर होणार होता.पण आता तोही रद्द करण्यात आला.८ मे रोजी पंजाब किंगज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील  होणारा आयपीएल सामनाही सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता.अश्यातच आता बीसीसीआय कडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार आज,शनिवार १७ मे पासून आयपीएल सामने सुरू करण्यात आले आहेत.आज शनिवारी बंगळुरु विरुद्ध कोलकाता यांच्यात सुरू झाला.
आयपीएलचे एकूण १७ सामने बाकी असून यात १३ साखळी फेरीतील सामने,तर ४ प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे.नव्या वेळापत्रकानुसार २७ मे पर्यंत साखळी सामने होणार असून त्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.तर ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.
          आयपीएल वेळापत्रक👇
१७ मे (शनिवार) : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, बेंगलुरू, सायंकाळी ७:३०
१८ मे (रविवार): राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स, जयपूर, दुपारी ३:३०
१८ मे (रविवार): दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स, दिल्ली, सायंकाळी ७:३०
१९ मे (सोमवार): लखनऊ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ, सायंकाळी ७:३०
२० मे (मंगळवार): चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली, सायंकाळी ७:३०
२१ मे (बुधवार): मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, सायंकाळी ७:३०
२२ मे (गुरुवार): गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, अहमदाबाद, सायंकाळी ७:३०
२३ मे (शुक्रवार): रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, बेंगलुरू, सायंकाळी ७:३०
२४ मे (शनिवार): पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर, सायंकाळी ७:३०
२५ मे (रविवार): गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद, दुपारी ३:३०
२५ मे (रविवार): सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली, सायंकाळी ७:३०
२६ मे (सोमवार): पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर, सायंकाळी ७:३०
२७ मे (मंगळवार): लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, लखनऊ, सायंकाळी ७:३०
२९ मे (गुरुवार): क्वालिफायर १, ठिकाण जाहीर व्हायचे आहे, सायंकाळी ७:३०
३० मे (शुक्रवार): एलिमिनेटर, ठिकाण जाहीर व्हायचे आहे, सायंकाळी ७:३०
१ जून (रविवार): क्वालिफायर २, ठिकाण जाहीर व्हायचे आहे, सायंकाळी ७:३०
३ जून (मंगळवार): फायनल,ठिकाण जाहीर व्हायचे सायंकाळी ७:३०
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!