Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती,बोगस अल्पसंख्यांक दर्जा व इतर बाबीं संदर्भात सहपालकमंत्र्यांना...

गडचिरोली जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती,बोगस अल्पसंख्यांक दर्जा व इतर बाबीं संदर्भात सहपालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे काल,गुरुवार १५ मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यानुसार काल दुपारच्या सुमारास जयस्वाल यांचे आरमोरी शहरात आगमन झाले व त्यांनी अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहरातील ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले.त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.प्रसंगी भाजपाचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक पंचायत राज व ग्राम विकास विभाग पदाधिकारी कैलास बगमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल  यांची प्रत्यक्ष भेट घेत गडचिरोली जिल्ह्यातील बोगस अल्पसंख्यांक दर्जा,शालार्थ आयडी,अपंग प्रमाणपत्र तसेच चौदावा आयोग अनियमितता संदर्भात चर्चा करून निवेदनाद्वारे तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीत साईनाथ अद्दलवार(मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी ) यांची सेवा ज्येष्ठता यादी वगळून मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी २ मे २०१२ नंतर केलेली अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती तसेच शिक्षक भरती घोटाळा मधून बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.तसेच विश्वशांती विद्यालय कुनघाडा(रै),  विश्वशांती विद्यालय भेंडाळा ता.चामोर्शी येथील बोगस अल्पसंख्याक दर्जा व बोगस शालार्थ आयडी प्राप्त करून करण्यात आलेली शिक्षक भरती,त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधीत शिक्षक,शिक्षिका यांचे वर कारवाईची मागणी.तसेच
गट ग्रामपंचायत शिवराजपूर ता.देसाईगंज यांनी १४ वा वित्त आयोग योजने अंतर्गत केलेल्या कामांमध्ये अनियमितता करून शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यानुसार राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री  ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिलेल्या संबंधीत तक्रारी लवकरच मार्गी लावून संबंधितावर योग्य ती कारवाई करू,अशी ग्वाही दिल्याचे भाजपाचे पदाधिकारी कैलास बगमारे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!