नागपूर :-हल्ली उघडकीस आलेला नागपूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या,नियमबाह्य मान्यता, शालार्थ आयडी घोटाळा अश्या गंभीर प्रकरणांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, आमदार संदीप जोशी यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक गठित करण्याची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “तपासून कार्यवाही करावी” अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.यानुसार शिक्षण विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणांची चौकशी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करून तातडीने शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य,पुणे) यांना देण्यात आल्या आहेत.नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.याच मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर याने पोलिसांकडे विविध कारनामे उघड केले आहेत.महेंद्र हा सदरमधील एका कॅफेत बसून दस्तऐवज तयार करीत असल्याची माहिती समोर आली.पोलिसांनी कॅफेतील कम्प्युटरची तपासणी केली असता त्यामध्ये ६८ शिक्षकांचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे दिसले. त्यापैकी १३ शिक्षकांना भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१६ ते २०२४ या कालावधीत नियुक्ती दिल्याचे समोर आले आहे.हे शिक्षक सध्या शाळेत कार्यरत आहेत किंवा नाहीत,याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.महेंद्र हा सध्या न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात आहे.पोलिसांनी महेंद्रच्या आवळेनगर येथील घरीही छापा टाकून ५३ उमेदवारांचे दस्तऐवज व २२ शिक्षकांचे प्रस्ताव जप्त केले होते.
शिक्षक घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल; विशेष तपास पथक होणार गठीत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

