Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईगुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त रेशनकार्डधारकांना १०० रुपयांना आनंदाचा  मिळणार शिधा...

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त रेशनकार्डधारकांना १०० रुपयांना आनंदाचा  मिळणार शिधा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- आनंदाचा शिधा वाटपाबाबत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.दिवाळीसारखाच आता गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रास्तधान्य दुकानावर आनंदाचा शिधा मिळणार आहे.याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होणार आहे.यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. 

१ कोटी ६३ लाख रेशनकार्डधारकांना १०० रुपयांचा आनंदाचा शिधा मिळणार आहे.दिवाळीत वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधामध्ये १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तूंचा समावेश होता.मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.दिवाळीनिमित्त शासनाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांना आनंदाजा शिधा वाटण्यात आला.प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना,अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे १ कोटी ६२ लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला.आताही आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!