Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीसाईटवर जाण्याच्या बहाण्याने डायरेक्ट बारमध्ये दारू ढोसण्याकरीता कर्मचाऱ्यांची होतेय एन्ट्री.. - चक्क शासकीय...

साईटवर जाण्याच्या बहाण्याने डायरेक्ट बारमध्ये दारू ढोसण्याकरीता कर्मचाऱ्यांची होतेय एन्ट्री.. – चक्क शासकीय कामकाजाच्या वेळेस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-जिल्ह्यात शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एक अनोखा व आगळा-वेगळा प्रकार हल्ली पहावयास मिळतो आहे.चक्क शासकीय कामकाजाच्या वेळेस साईटवर वा इतर सार्वजनिक कामांचा बहाणा करून कार्यालयातून बाहेर पडणारे काही कर्मचारी डायरेक्ट विदेशी वा इतर मद्य पिण्याकरीता बारमध्ये बसून दारू ढोसत असल्याने यांवर कुणाचा वचपा राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारू बंदीला सुरूवात झाली.मात्र जिल्ह्याच्या सिमांना जवळच लागून असलेले चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया अशी तिन्ही जिल्ह्यात दारू बंदी नसल्याने त्याठिकाणी लायसेन्स धारक बार च्या माध्यमातून दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याचाच फायदा गडचिरोली जिल्ह्यातील काही दारू पिण्याचे शौकीन असणारे शासकीय व कंत्राटी कर्मचारी घेतांना दिसून येत आहेत.साईटवर वा इतर ठिकाणी कामा निमित्त जाण्याच्या बहाण्याने कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेस दारूचे शौकीन असणारे शासकीय व कंत्राटी कर्मचारी तासंन तास बार मध्ये बसून गप्पा-गोष्टी झोडून दारूचा ठर्रा मारतांना आढळून येतात.

खरे म्हणजे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारी हलचल पंजी नोंदवही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कुठेही जा व काहीही करा; असे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.बारमध्ये  दारूचा ठर्रा मारणाऱ्या व तासंन तास बार मध्ये बसणाऱ्या शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भांडाफोड करावयाचे असल्यास बार मधील सी सी टिव्ही फुटेज तपासल्यास मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शासकीय कामकाजाच्या वेळेस चक्क बार मध्ये दारूचा ठर्रा मारणाऱ्या दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही; तोपर्यंत अशीच अवस्था पहावयास मिळणार असल्याचे बोलले जाते आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!