Wednesday, June 3, 2026
Homeब्रम्हपुरीरक्तविर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टाईगर ग्रुपच्या अध्यक्षांची घेतली आकस्मिक भेट...!

रक्तविर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टाईगर ग्रुपच्या अध्यक्षांची घेतली आकस्मिक भेट…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रह्मपुरी :- महाराष्ट्रात समाज कार्यात मागील १५ वर्षापासुन कार्यरत असणारी सामाजिक संगठना म्हणजे टाईगर ग्रुप आहे. अत्यंत दुर्लभ परस्थितीतुन टाइगर ग्रुपची सुरुवात झाली.समाजातील समस्या अनेक असुन त्यांचे निराकरण करणे कठीण आहे. परंतु त्या समस्यांना पै.तानाजी जाधव यांनी तोंड देत सामाजिक कामाला टाईगर ग्रुपच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातून सुरु केले.अनेक गोर-गरीब जनतेला त्यांनी न्याय मिळवुन दिला.संघटनेमध्ये अनेक युवा वर्ग जुड़लेला असून सामाजिक समस्याचे निराकरण करने हे उद्देश्य धरुन कार्य करीत आहेत.

अशातच ब्रम्हपुरी तालुक्यातुन सुरु झालेली एक सामाजिक संगटना म्हणजे ‘रक्तविर सेना’. ज्या संघठनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत रक्तासाठी मदत केली जाते.ब्रम्हपुरी तालुक्यातीलच रूग्ण नाही; तर गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर,गोंदिया जिल्ह्यातील सुध्दा अनेक रुग्णांना मोफत रक्त मदत करण्यास रक्तविर सेना तत्पर आहे.दोन्ही संगठना सामाजिक समस्या अनुसरुन काम करीत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत टाईगर ग्रुप हे महाराष्ट्र भर पसरले आहे.यात रक्तविर सेना गेल्या एक वर्षापासून सतत आपल्या कार्यातुन चर्चेत रंगत असुन ह्या संघटनेचे सुद्धा बऱ्याच मोठ्या क्षेत्रात कमी वेळेत गतीने जाळे पसरविले असुन रक्तविर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे व उपाध्यक्ष मायासिंग बावरी गडचिरोली येथे संघटनेच्या कार्याची दखल घेण्यासाठी गेले असता;गडचिरोली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमा प्रसंगी टाईगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांची रक्तविर सेना अध्यक्ष निहाल ढोरे व उपाध्यक्ष मायासिंग बावरी यांनी आकस्मित भेट घेऊन विविध विषयांवर व सामाजिक समस्यांवर चर्चा केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!