- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्याने नक्षलवादी संघटना गनिमी काव्यासाठी व दडून बसण्यासाठी जंगलाचा आसरा घेत असतात व हिंसक कारवाया,जाळपोळ,हत्या व विवक्षित कृत्ये करीत असतात.अशातच नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याकरीता शासनाने ठोस पावले उचलली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात नव्याने पोलीस ठाणे उभारण्यात येत आहेत.त्यातच गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाने(सिआरपीएफ)जंगल परिसरात फिरणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता,चारही संशयित व्यक्ती जहाल नक्षलवादी निघाल्याने आज,शनिवार १९ एप्रिलला अटक करून विविध कलमान्वये चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार,गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुका उपविभागातंर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन ताडगाव येथील पोलीस पथक व केंद्रीय राखीव पोलीस दल तुकडी क्रमांक-९ च्या एफ कंपनीचे जवान संयुक्तपणे नक्षलवाद विरोधी अभियान राबवित होते.अशातच त्यांना भामरागडच्या पल्ली जंगल परिसरामध्ये चार संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळून आले.त्यामुळे चार संशयितांना पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता या ठिकाणी चौकशीसाठी नेले.अधिक चौकशी केली असता,चारही संशयित जहाल नक्षलवादी निघाल्याने पोलिसांना धक्काच बसला.त्यानुसार संशयितांनी आपली नावे-
१.सायलु भुमय्या मुडेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा (डीव्हीसीएस,दक्षिण गडचिरोली डिव्हीजन),वय ५५ वर्षे,रा.लिंगापूर,ता.दरपेल्ली,जि.निजामाचाद (तेलंगाना) (जैनी खराटम हिचा पती),
२.जैनी भिमा खराटम ऊर्फ अखीला ऊर्फ रामे (डिव्हीसीएम,भामरागड दलम/सचिव भामरागड एरीया कमिटी),वय ४१ वर्षे रा.कंचाला,ता. भोपालपट्टानम,जि.बीजापूर (छ.ग.)(सायलु मुडेला ऊर्फ रघु याची पत्नी),
३.झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु (सदस्य,भामरागड दलम),वय ३० वर्षे, रा.येचली,ता.भामरागड जि. गडचिरोली.
४.मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता (सदस्य,भामरागड दलम), वय २१ वर्षे,रा.कापेवंचा ता.अहेरी,जि. गडचिरोली.
अशी नावे सर्वांनी सांगितली.त्यानुसार अधिक चौकशीअंती चारहीजण रेकॉर्डनुसार जहाल नक्षलवादी निघाले.ते पोलिसांची रेकी करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने पल्ली जंगल परिसरात फिरत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.अशातच चारही नक्षलवादी हे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्येही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन कोठी येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
- Advertisement -

