Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीकाँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.....

काँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.. – नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात ५ एप्रिल २०२५ रोजी भर उन्हात काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले होते.सदरचे आंदोलन हे भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते.सदरच्या आंदोलनास यश आल्याचे दिसून येत आहे.अखेर आज,शनिवार १२ एप्रिल रोजी गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ४० कुमेक्सने  पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिक,शेतकरी व मत्स्यव्यावसायिक यांना गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वैनगंगा नदीकिनारी असलेले देसाईगंज(वडसा), आरमोरी व चामोर्शी तालुक्यांतील सर्व गावांमध्ये तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नदीपात्रात शेती करणारे शेतकरी,मासेमारी करणारे,नदीकिनारी पाणी पिण्यासाठी गुरे नेणारे नागरिक तसेच पूल,रस्ते बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी
खबरदारी घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!