Saturday, September 5, 2026
Homeनागपूर'माझे काका मुंबई मंत्रालयात उच्च पदस्थ अधिकारी आहेत; तुम्ही माझे काहीही बिघडवू...

‘माझे काका मुंबई मंत्रालयात उच्च पदस्थ अधिकारी आहेत; तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही’; असे म्हणणारा वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक निलंबित.. – बनावट शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विविध प्रकरणात शिक्षक किंवा संघटनांचे पदाधिकारी तक्रार करण्यास गेल्यावर, ‘माझे काका मुंबई मंत्रालयात उच्च पदस्थ अधिकारी आहेत,तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही,वाट्टेल तिथे तक्रारी करा’, अशी अरेरावीची भाषा वापरणारे नागपूर शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे. विविध शाळांमध्ये अपात्र शिक्षक व शिक्षकेत्तरर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडीच्या आधारे वेतनास पात्र ठरवून शासनाची कोट्यवधीने फसवणूक करण्यात आल्याने शिक्षण उपसचिवांनी केलेल्या चौकशीच्या आधारावर वाघमारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.प्रकरणात आणखी काही बडे अधिकारी जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१९ पासून बोगस प्राथमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्याची माहिती समोर आली होती. सध्या नागपूर जिल्ह्यात जवळपास ५८० अशा बोगस
कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतनाची उचल करून शासनाला कोट्यवधीचा चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे. शालार्थ पोर्टलवर आढळलेल्या त्रुटींच्या आधारे तपासणी अंती,सदरची खळबळजनक बाब समोर आली होती.त्यानंतर शिक्षण विभागाकडून या सर्व शाळांची माहिती मागविण्यात आली होती.शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेत समिती तयार करून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.चौकशी अहवाल सादर केल्यानंतर आता कारवाईचा फास आवळला जात आहे.यात मोठे अधिकारीही गुंतले असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करून पहिली कारवाई करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!