Thursday, August 6, 2026
Homeनागपूरअखेर गगनाला भिडलेले सोने-चांदीचे भाव ट्रम्प इफेक्टने कोसळले...

अखेर गगनाला भिडलेले सोने-चांदीचे भाव ट्रम्प इफेक्टने कोसळले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोने-चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टने कोसळले. नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ पाच दिवसात चांदी किलोमागे जीएसटीविना १२,४०० रुपयांनी घसरली, तर दहा ग्रॅम शुद्ध सोने २,३०० रुपयांनी उतरले.सोने-चांदी स्वस्त झाल्याने लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला,परंतु भावपातळी पाहता सोन्याचे भाव अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.दुसरीकडे ग्राहक भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत.काही दिवसांपासून सुरू असलेला टॅरिफ वॉर आणि डॉलरचे दर कमी झाल्याने भावात घसरण झाल्याचे तज्ज्ञ म्हणतात.सोने आणि चांदीच्या भावाची तुलना केल्यास एप्रिल महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव जवळपास ८९ हजारांवर आलेत.४ एप्रिलच्या २४ हजारांच्या तुलनेत ५ एप्रिल रोजी चांदी तब्बल ५ हजार रुपयांनी कमी होऊन ८९ हजारांवर,तर सोने ४ एप्रिलच्या ९१,४०० रुपयांच्या तुलनेत ५ एप्रिल रोजी २,३०० रुपयांनी घसरले आणि ८९,१०० रुपयांवर स्थिरावले.भाव अचानक कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी आहे.सराफांकडे ३ टक्के जीएसटीसह सोने ९१,७७३ रुपये आणि चांदीचे भाव ९१,६७० रुपये आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!