- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पैश्यानेच सर्वकाही विकत घेतले जात नाही. या दुनियेत आजही माणुसकी जपणारी काही माणसे जिवंत आहेत.आपण नेहमी बघत असतो की,आपल्या डोळ्यासमोर एखादा अपघात झाला तर आपण वाहन थांबवून अपघातग्रस्तासाठी पटकन धाऊन जातो व त्यांची आस्थेने विचारपूस करीत असतो. ‘कुठे लागला तर नाही ना..!’ अश्यावेळी आपण ती व्यक्ती कोण आहे,हे कधीही पाहत नसतोच.तश्याच प्रकारे काल, शनिवारी ५ एप्रिलला एखाद्या रियल चित्रपटाप्रमाणे वाटावी अशी घटना नागपूर ते काटोल रेल्वे मार्गावर बंगळुरू दानापूर एक्स्प्रेसमध्ये घडली.धडधडत्या ट्रेनमध्ये तिला प्रसवकळा सुरू झाल्या. तिच्यासोबत तिचे कोणतेच नातेवाईक नव्हते.ती वेदनांनी तळमळू लागली.ते पाहून एका सहप्रवाशाने ‘रेल मदत’ वर त्याची माहिती देऊन तात्काळ मदतीची मागणी नोंदवली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही ट्रेन लगेच काटोल स्थानकावर थांबविण्याचे निर्देश दिले.तत्पूर्वी स्थानकावर रुग्णवाहिका आणि रेल्वे कर्मचारीही सज्ज ठेवले.त्यांनी महिलेला तात्काळ ट्रेनमधून खाली घेऊन हॉस्पिटलमध्ये नेले.तेथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.ट्रेन नंबर ०३२६० मध्ये कोमल नामक एक गर्भवती महिला काल शनिवारी सकाळी एकटीच प्रवास करीत होती.सकाळी ८:१४ वाजता गाडीने नागपूर स्थानक सोडले.साधारणतः २० मिनिटे झाली असतील त्याच वेळेस कोमलला तीव्र प्रसवकळा सुरू झाल्या.ते लक्षात आल्याने बाजूच्या प्रवाशाने सकाळी ८:४५ वाजता ‘रेल मदत’ पोर्टलवर तक्रार नोंदवली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच काटोल रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबविण्याचे निर्देश दिले.तिच्या प्रसूतीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले. जितेंद्र सिंग,सारिका सेलोकर,मीराबाई,के.एन.देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी कोमलला मदतीचा हात दिला. सहप्रवाशासह रेल्वे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे कोमलला वेळेवर मदत मिळाली.त्यामुळेच तिची प्रसूती चांगल्या प्रकारे होऊ शकली.दरम्यान,रेल्वे कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी नवजात शिशूसाठी नवीन कपड्यांचीही व्यवस्था केली.हे सर्व झाल्यानंतर कोमलच्या नातेवाइकांना कळविण्यात आले.त्यानंतर काही वेळेतच ते तेथे पोहोचले.
- Advertisement -

