उद्रेक न्युज वृत्त :-जगाबरोबरच देशात धुरंदर लोकांची कमी नाही.मालक हा मालकच असतो,पण त्यावर काही मर्यादाही असतात.काम करणारे कर्मचारी वा कामगार त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीनुरुप चालत असतात.मात्र,त्याचा गैरफायदा घेऊ नये,अन्यथा एक दिवस ज्यांच्या भरवश्यावर आपण मोठे होतो; अश्यांनी जर कां साथ सोडली तर एक दिवस वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.अशातच एका कंपनीच्या मालकाचा अमानवीय कृत्याचा कारनामा उघडकीस आला आहे.एका कंपनीचा मालक त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मच्यांच्या मजबुरीचा फायदा घेतांना दिसून येतो.कंपनीची उत्पादने विकणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून त्याने चक्क कर्मचाऱ्यांना गळ्यात पट्टा घालून फिरवले.एवढेच नाही तर कुत्र्यासारखे वडग्यामध्ये पाणीही प्यायला लावले. सदरचा संतापजनक प्रकार केरळच्या कोची शहरामध्ये घडला आहे.याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मालकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.एका खासगी कंपनीचा मालक हुबैल याने सेल्सचे(विक्री)टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून कंपनीतील पुरुष कर्मचाऱ्यांना क्रूरपणे वागणूक दिली. मूळचा वायनाड येथील रहिवासी असलेल्या हुबैलने कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये पट्टा बांधला,त्यांना कुत्र्यासारखे फिरवले,कुत्र्यासारखे वडग्यामध्ये पाणी पिण्यासही भाग पाडले.एवढेच नाही तर खोलीत कोपऱ्यामध्ये कुत्र्यासारखे पाय वर करून लघवी करण्यास,कपडे काढून अश्लील हावभाव करण्यास, तसेच चावून फेकून दिलेले फळे आणि फरशीवर पडलेली नाणीही चाटण्यास भाग पाडले. मातूभूमीने दिलेल्या वृत्तानुसार,घरोघर जाऊन कंपनीची उत्पादने विकणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुबैलने टार्गेट पूर्ण झाले नाही म्हणून शिक्षा दिली आहे.विशेष म्हणजे हुबैलला याआधीही अशाच गैरकृत्यांप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्या होत्या.त्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे.आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
व्हिडिओ👇

