Saturday, September 5, 2026
Homeनागपूरमृत निवृत्त कर्मचाऱ्यांना दाखवले जिवंत; कोट्यवधी रुपयांचा पेन्शन घोटाळा... - पंचायत समितीतील...

मृत निवृत्त कर्मचाऱ्यांना दाखवले जिवंत; कोट्यवधी रुपयांचा पेन्शन घोटाळा… – पंचायत समितीतील महिला कर्मचारी बडतर्फ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मृत निवृत्त कर्मचाऱ्यांना जिवंत दर्शवून त्यांची पेन्शन हडपून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या पारशिवनी पंचायत समितीमधील निलंबित महिला कर्मचारी संगीता नेवारे यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी पंचायत समितीमधील शिक्षण विभागात हा घोटाळा झाला होता.या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार लिपीक संगीता नेवारे वर्षानुवर्षे पेन्शन टेबल हाताळत होती.बरीच वर्ष एकाच टेबलावर काम करीत होत्या. मृत निवृत्त कर्मचाऱ्यांना जिवंत दाखवून त्यांचे पेन्शन हडपण्याची शक्कल लढवली होती.ही रक्कम नातेवाइकांच्या बँक खात्यात वळती केली जात होती. या प्रकरणात नेवारे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती.आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता.दरम्यान, समितीने केलेल्या चौकशीदरम्यान हा घोटाळा तब्बल २ कोटी ७२ लाखांच्या घरात असल्याचे उघडकीस आले होते.त्यामुळे घोटाळ्यातील मुख्य आरोपी संगीता नेवारे यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून प्रशासनाने घोटाळ्याची रक्कम संगीता नेवारे हिच्याकडून वसूल करण्याचे निर्देश  दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!