Wednesday, August 26, 2026
Homeकुरखेडा२८ वर्षीय विवाहित तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू...

२८ वर्षीय विवाहित तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असतांना अनेकांनी थंड हवेसाठी कुलर सुरू केले आहेत.कुलरच्या हवेने काहीकाळ कां असेना थंडावा मिळतो.अशातच कुलर सुरू करतांना काळजी घेणे आवश्यक असते.त्यातील पाण्यामुळे विजेचा शॉक लागून एखादेवेळी जीव गमावावा लागतो.असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील खरकाडा येथे काल,सोमवारी ३१ मार्च रोजी उघडकीस आला आहे.घरातील कुलर सुरू करायला गेलेल्या एका २८ वर्षीय विवाहित तरुणाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.लहू मनोहर आत्राम असे विजेचा शॉक लागून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,लहू आत्राम हा काल,सोमवारी ३१ मार्च ही राशनकार्डची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख असल्याने नागपूरहून आपल्या स्वगावी खरकाडा येथे आला होता.उन्हातून आल्यावर त्याने दुपारी ४ च्या सुमारास घरातील कुलर सुरू करण्याचा प्रयत्न केला.अशातच कुलरमध्ये करंट आल्याने बटन दाबताच त्याला जोरदार शॉक लागला.तितक्यातच घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत तात्काळ लहू याला गावाहून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.विजेचा शॉक इतका जोरदार होता की, रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.लहू हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.तो नागपूर येथील एका खासगी कंपनीत कामावर होता.एका चुकीने होत्याचे नव्हते झाले.त्याच्या मृत्यूने परिवारात शोककळा पसरली असून पत्नीने घटनास्थळी एकच टाहो फोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!