Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्रा.निलेश हलामी यांना आचार्य पदवी बहाल...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्रा.निलेश हलामी यांना आचार्य पदवी बहाल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे
देसाईगंज(गडचिरोली):-स्थानिक आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य शाखेतील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.निलेश हलामी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील व्यवसायिक अर्थशास्त्र विषयात नुकतीच आचार्य पदवी(Ph.D)बहाल करण्यात आली आहे.प्रा.निलेश हलामी यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत आर्थिक योजनांच्या लाभासंदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे तुलनात्मक अध्ययन या विषयावर प्रा. डाॅ.राजविलास कारमोरे संशोधन केंद्र विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर जि.वर्धा यांच्या मार्गदर्शनात संशोधन कार्य पूर्ण केले.
प्रा.निलेश हलामी हे गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम,आदिवासीबहूल घोटसुर येथील रहिवासी असुन आपले माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रम शाळा कसनसुर व लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथे पुर्ण केले.पुढिल शिक्षण महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा या संस्थेत राहून आनंद निकेतन महाविद्यालयातून बी.काॅम पदवी पुर्ण केली.आपण उच्च शिक्षण घ्यावे या जिद्दीने एम.काॅम.,एम.फिल.,बी.एड शिक्षण पूर्ण करत प्राध्यापक पदासाठी लागणारी राज्य पात्रता परिक्षा (सेट) २०१० ला वाणिज्य विषयात उत्तीर्ण होत गडचिरोली जिल्ह्यातून वाणिज्य शाखेतील पहिले आदिवासी विद्यार्थी म्हणून मान मिळवला.
२०११ ला देसाईगंज येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून वाणिज्य शाखेतील विद्यार्थांना अध्ययनाचे धडे देत आपले संशोधन कार्य करीत राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील आचार्य पदवी (Ph.D) मिळवल्याबदल नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदिश शर्मा,सचिव मोतीलाल कुकरेजा व संस्थेचे सर्व सदस्य,महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा,प्राचार्य डाॅ.श्रीराम गहाणे, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,मित्रपरिवार व पत्नी रूपाली हलामी यांनी प्रा.निलेश हलामी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यशात महाविद्यालयाचा आणि सहकारी मित्रपरीवरांचा महत्वाचा वाटा असल्याने  प्रा.निलेश हलामी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!