Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरबारावीत असतांना दोघांची मैत्री; गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे 'तिने' संपर्क तोडल्याने वडिलाचा काटा काढला..!

बारावीत असतांना दोघांची मैत्री; गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे ‘तिने’ संपर्क तोडल्याने वडिलाचा काटा काढला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बारावीत असतांना दोघांची मैत्री होती.मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तिने त्याच्याशी संपर्क तोडला. कारागृहाबाहेर आल्यानंतर तो तिला भेटायला गेला. मात्र,तिने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने तिच्या वडिलांचा चाकूने भोसकून दिवसाढवळ्या खून केल्याची घटना काल, बुधवारी २६ मार्च रोजी दुपारी २ च्या दरम्यान नागपूर शहराच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी येथे घडली.नरेश वालदे वय ५५ वर्षे, इंदिरानगर,जाटतरोडी असे मृताचे नाव आहे,तर नीलेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम वय ३५ वर्षे,रामबाग व ईश्वर ऊर्फ जॅकी सोमकुवर अशी आरोपींची नावे आहेत.नीलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याने २०१९ साली एकाची हत्यादेखील केली होती. संबंधित तरुणीला नीलेश अनेक दिवसांपासून त्रास देत होता.मधील काळात तो शांत होता.मात्र, काही दिवसांअगोदर त्याने तिला गाठले व लग्नच कर,अशी जिद्द करू लागला.तिने त्याला नकार दिल्यावर त्याने बेदम मारहाणदेखील केली होती.तिने घरी या प्रकाराची माहिती दिली होती.नरेश यांनी आरोपी नीलेशला जाब विचारला होता व मुलीला त्रास न देण्याबाबत बजावले होते.यावरून नीलेश संतापला होता.वडिलांच्या दबावामुळेच मुलगी लग्नाला नकार देत असल्याचा त्याचा गैरसमज झाला.काल,बुधवारी २६ मार्चला दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास नीलेश ईश्वरसोबत दुचाकीने जाटतरोडी पोलिस चौकीजवळ पोहोचला.तेथे त्यांनी नरेश यांना गाठले व शिवीगाळ करत नीलेशने त्यांच्या पोटात खंजीर भोसकला व घटनास्थळावरून दोघांनीही पळ काढला.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली.नरेश यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.इमामवाडा पोलिस ठाण्यात नीलेश व ईश्वरविरोधात गुन्हा दाखल करून दोघांचाही शोध घेत पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
‘बेबी मी बघ काय केले आहे’ ..👇
आरोपी नीलेशने वालदे यांच्या हत्येनंतर फोटो घेतला व तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. ‘बेबी मी बघ काय केले आहे’ असे त्याने कॅप्शन लिहिले व तुटलेल्या हृदयाचे इमोजी टाकले.नीलेशच्या फ्रेंडलिस्टमधील काही जणांनी त्याला लाइकदेखील केले.त्याच्या या कृतीमुळे पोलिसदेखील अवाक् झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!