Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोली'लालच बुरी बला'..! आदिवासींसाठी एकेकाळी देवदूत ठरले; पण पैश्याच्या लालचेने सर्वकाही गमावून...

‘लालच बुरी बला’..! आदिवासींसाठी एकेकाळी देवदूत ठरले; पण पैश्याच्या लालचेने सर्वकाही गमावून बसले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असतांना १५ जुलै २०२४ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी देवराव भोकरे हे स्वतः मलेरियाग्रस्त असतांना एका हाताला सलाईन व दुसऱ्या हाताने रुग्णास प्रीस्क्रिप्शन लिहून कर्तव्यपूर्ती करतांनाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होऊन त्या कालावधीत आदिवासींसाठी देवदूत ठरल्याची वाहवाही त्यांनी मिळवली होती.मात्र, ‘लालच बुरी बला है’ याचा खरा प्रत्यय त्यांच्या बाबतीत घडलेला असून पैश्याच्या लालचेने डॉ.भोकरे सर्वकाही मिळवलेली प्राण प्रतिष्ठा गमावून बसले आहेत.भोकरे यांनी लाच स्वीकारली अन् ते अलगदच एसीबीच्या सापळ्यात अडकले.
याबाबत अधिक माहिती अशी की,लाहेरी प्राथमिक
आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सहाय्यकाचे फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ व नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांचे थकीत पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरीता कार्यालयीन प्रमुख म्हणून डॉ.संभाजी भोकरे यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. प्रमाणपत्रासाठी डॉ.भोकरे यांनी २ मार्च २०२५ रोजी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र,तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार नोंदवली.त्यानुसार मंगळवारी २५ मार्चला एसीबीच्या पथकाने पडताळणी केली.तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये काल,बुधवार २६ मार्च रोजी डॉ.संभाजी भोकरे याने स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून आरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ.भोकरे याच्या विरूध्द पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!