नागपूर :-३० वर्षीय तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे त्यांनी वन विभागाची परवानगी घेऊन सागवान लाकडाची दारे बनविण्यासाठी ६ फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथून १५ सागवानाची लाकडे आणली.ही लाकडे त्यांनी लकडगंजमधील धनलक्ष्मी सॉ मिलमध्ये देऊन १५ पैकी ५ लाकडांच्या पाट्या तयार केल्या.या पाट्या घरी नेण्यासाठी त्यांनी वनविभागाच्या लकडगंज कार्यालयातून परवानगीदेखील घेतली.परंतु लाकडावर हॅमर मार्क करण्यासाठी आलेला आरोपी वनरक्षक सोनुले याने हॅमर मार्कसाठी १०० रुपये लागत असतांना ५०० रुपये घेतले.त्यानंतरही आरोपी सोनुले याने १ हजार रुपयांची लाच मागितली.परंतु लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार दिली.त्यानुसार काल गुरुवारी एसीबीचे अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत केदार, भागवत वानखेडे, महेश सेलोकर, सचिन किन्हेकर, विजय सोळंकी यांनी सापळा रचून लाचखोर वनरक्षक सोनुले याला लाच घेतांना रंगेहात अटक केली.रीतसर परवानगी घेतल्यानंतरही सागवान लाकडाच्या पाट्यांवर हॅमर मार्कसाठी १०० ऐवजी ५०० रुपये घेतल्यानंतर एक हजाराची लाच घेणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल गुरुवारी सायंकाळी लकडगंज परिसरात रंगेहात अटक केली आहे.रमेश रामजी सोनुले वय ४३ वर्षे असे लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.तो लकडगंज येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयात कार्यरत आहे.
लाच घेण्यासाठी तगादा; वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

