Tuesday, May 26, 2026
Homeगोंदियादोन हजार रुपये देतो; मला एक चुंबन दे..! - शिक्षकाकडून शाळेतील शिक्षकाच्या...

दोन हजार रुपये देतो; मला एक चुंबन दे..! – शिक्षकाकडून शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग; गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शाळेतील शिक्षकाने चक्क त्यांच्याच शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाच्या घरी जाऊन पत्नीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी घडली.शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत.तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच
आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना देवरी येथे घडली.या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.माहितीनुसार,आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर हा मागील काही वर्षापासून देवरी येथील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
या शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला दोन हजार रुपये देतो; मला एक चुंबन दे,अशा प्रकारचे लज्जासपद कृत्य करून तिचा विनयभंग केला.याविषयीची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध देवरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून देवरी पोलिसांनी अपराध क्रमांक ५३/२५ भारतीय न्याय संहिता ७५ (२)७९ या कलमांतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गीता मुळे या करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!