- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आत्महत्या करून कुणाला काय मिळते? हेच कळेनासे झाले आहे.लोकांना जीवनाची किंमत कळतच नाही वाटते.एखाद्यावर अख्खा कुटुंब अवलंबून असतो; अश्यांनी काय करावे? त्यांच्याकडे तरी बघून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये.त्यातच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील काजळी शिवारात शनिवारी दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.कैलास बारंगे वय ४५ वर्षे, रा.नागाझिरी,ता.कारंजा घाडगे,जिल्हा वर्धा असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.ते नागपूर जिल्हा परिषदेच्या पुसागोंदी ता.काटोल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यामुळे ते मागील काही वर्षापासून कोंढाळी येथील रामनगरात कुटुंबीयांसह राहायचे.कैलास बारंगे हे शनिवारी काजळी शिवारात गेले होते.शिवारातील शेतात असलेल्या विहिरीत त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह विहिरीतून काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी कारंजा (घाडगे) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. कैलास बारंगे यांचे बहीण जावई भास्कर मुन्ने काजळीला राहतात.त्यांची याच गावाच्या शिवारात शेती आहे.ते शनिवारी दुपारी काजळी शिवारातील त्यांच्या बहिणीच्या शेतात गेले होते.आधी त्यांनी भास्कर मुन्ने यांच्याशी बोलून विचारपूस केली.ते शेतात कामाला लागताच कैलास त्यांच्याच शेतातील विहिरीजवळ गेले आणि चष्मा व चपला काठावर ठेवून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
- Advertisement -

