Saturday, September 5, 2026
Homeनागपूरचक्क सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात... - जमीन प्रकरणात गुन्हा दाखल...

चक्क सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात… – जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याची सेटिंग भोवली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याची दोन लाख रुपयांची सेटिंग कोराडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास भोवली असून दोन लाखांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने काल,बुधवारी दुपारच्या सुमारास रंगेहाथ अटक केली असल्याने पोलिस विभागातील भ्रष्टाचारी तत्त्वांचा मुद्दा परत एकदा समोर आला आहे.प्रेमानंद दादाराव कात्रे वय ४३ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
एका व्यक्तीविरोधात मौजा कवठा,कामठी येथील संयुक्त मालकीच्या शेतीच्या विक्रीपत्राच्या व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेकडून आली होती.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची भीती कात्रेने दाखविली होती.जर गुन्हा दाखल करायचा नसेल व प्रकरण दाबायचे असेल तर दोन लाख रुपये लागतील, असे कात्रेने संबंधित व्यक्तीला म्हटले होते. संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.या प्रकरणाची प्राथमिक शहानिशा करून एसीबी पथकाने सापळा रचला.काल बुधवारी ५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास कोराडी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीकडून दोन लाखांची लाच स्वीकारली असता एसीबीच्या पथकाने कात्रेला रंगेहाथ पकडले. संबंधिताने अगोदर पैसे देण्यास नकार दिला होता व गावातीलच सरपंचाच्या मदतीने प्रकरण सोडविण्याची भाषा केली होती.मात्र,तात्काळ अटक करण्याची धमकी कात्रेने दिल्याने संबंधित व्यक्तीने अखेर एसीबीकडे धाव घेतली.कात्रेविरोधात कोराडी पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रीती शेंडे, नीलेश उरकुडे,भरत ठाकूर,भागवत वानखेडे,हेमराज गांजरे,दीपाली भगत,विजय सोळंके यांनी कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!