Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळावाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार; कोंढाळा जंगल परिसरातील घटना.. - वन विभागातर्फे सतर्कता...

वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार; कोंढाळा जंगल परिसरातील घटना.. – वन विभागातर्फे सतर्कता बाळगण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-८०८ मध्ये वाघाने हल्ला चढवून गाभण म्हैस ठार केल्याची घटना आज,बुधवार २९ जानेवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अशोक दोडकू दोणाडकर वय ४० वर्षे,रा.खरकाळा, ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे म्हैस मालक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढाळा गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी पात्र लागून आहे.सध्या स्थितीत नदीपात्रातील पाण्याची पातळी नाहीच्या बरोबर असल्याने पलीकडील ब्रम्हपुरी तालुक्याच्या खरकाळा,रनमोचन,पिंपळगाव परिसरातील गुराखी नदी पार करून नदी पात्रास लागून असलेल्या कोंढाळा जंगल परिसरात गुरे चराईसाठी आणित असतात.अश्याच प्रकारे खरकाळा येथील गुराख्याने काल,मंगळवारी २८ जानेवारीला कोंढाळा जंगल परिसरात गुरे चराईसाठी आणले असता गुरांच्या कळपातून गाभण असलेली म्हैस घरी परतली नसल्याने शेतकरी अशोक दोणाडकर यांनी शोधाशोध केली.शोधाशोध करीत असतांना म्हैस गाव परिसरात कुठेही आढळून न आल्याने त्यांनी आज कोंढाळा जंगल परिसरात शोध घेतला.शोध घेतला असता जंगल परिसराच्या कक्ष क्रमांक-८०८ मध्ये सदर म्हैस मृतावस्थेत आढळून आली.म्हशीच्या गळ्या जवळील भागाचे मास खाल्ल्याचे दिसून आल्याने सदर घटनेबाबत देसाईगंज वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाचे वनक्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे, कोंढाळा गावच्या महिला वनरक्षक नीलिमा सेलोटे यांना माहिती देताच घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानुसार म्हशीला वाघाने ठार केल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यास कळविले. कोंढाळा जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांनी जंगल परिसर लागून असलेल्या भागात जातांना सतर्कता बाळगावी; असे आवाहन देसाईगंज वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!