Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरयुवक काँग्रेसमध्ये वादळ..! आंदोलनाला दांडी; ६० पदाधिकारी तडकाफडकी कार्यमुक्त..

युवक काँग्रेसमध्ये वादळ..! आंदोलनाला दांडी; ६० पदाधिकारी तडकाफडकी कार्यमुक्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-युवक काँग्रेसतर्फे आयोजित संघ मुख्यालयाला घेराव घालण्याच्या आंदोलनाला दांडी मारल्याचे कारण देत प्रदेश युवक काँग्रेसने ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे. कारवाई झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव शिवानी वडेट्टीवार,केतन ठाकरे,आदींचा समावेश आहे.या कारवाईमुळे युवक काँग्रेसमध्ये वादळ उठले असून,प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात मोर्चा उघडला जाण्याची चिन्हे आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसने रविवारी अचानक आंदोलन पुकारले.या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले.मात्र,आंदोलनात ५० पेक्षा कमी कार्यकर्ते सहभागी झाले बहुतांश पदाधिकारी प्रमुया या आंदोलनात सहभागीच झाले नाहीत.युवक काँग्रेसचे पदाधिकारी जेव्हा देवडिया काँग्रेस भवनाकडून निघाले तेव्हा पोलिसांनी काही अंतरावरच त्यांना रोखले.ज्या अपेक्षेने हे आंदोलन पुकारण्यात आले होते तसा माहोल युवक काँग्रेसला तयार करता आला नव्हता.या सर्व घटनाक्रमाची प्रभारी श्रनिवास नालमवार यांनी दखल घेतली.
पदमुक्त करण्यात आलेले पदाधिकारी👇
अपर्णा राऊत,आकाश गुजर,पंकज सावरकर,डॉ.प्रणित जांभुळे, आमिर शेख,अनुराग भोयर,डॉ.मेघा सावसाकडे, सचिव सईश वारजूरकर,मिथिलेश कन्हेरे,फिरोज शेख, अक्षय हेटे,शुभम गिरडकर,तौसिफ अहमद,मंगेश डाखोळे,रौनक चौधरी,संदीप जैन,केतन रेवतकर,
स्नेहा सातपुते,सुमित भालेकर आदींचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!