Sunday, September 20, 2026
Homeनागपूरआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा सिद्ध करता येणार नाही- उच्च न्यायालय

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा सिद्ध करता येणार नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नऊ वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यात काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला.त्यामुळे तरुणीने चिठ्ठी लिहून गळफास लावून आत्महत्या केली.त्यानुसार न्यायालयात खटला चालला.सत्र न्यायालयाने तरुणास दोषी ठरवून आरोप सिध्द केले.त्यानुसार तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली.त्यामुळे तरुणास मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात नमूद केले की,केवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे कोणावर गुन्हा सिद्ध करता येणार नाही.न्या.उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.अमरावतीच्या दर्यापूर येथील एका तरुणाचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील तरुणीशी नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बीसीए पदवीधर असलेल्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.मात्र,नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.त्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याच्या संशयाने व्यथित झालेल्या तरुणीने ३ डिसेंबर २०२० रोजी चिठ्ठी लिहून गळफास घेतला.न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की,घटनेच्या चार महिने आधीच दोघांमधील नाते संपुष्टात आले होते.व्हॉट्स ॲप चॅटवरून दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचे स्पष्ट होते.विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तरुणीने तरुणाची माफीही मागितली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की,नाते तुटल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गृहीत धरता येणार नाही. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येचे कृत्य यांच्यात थेट संबंध असणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!