Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करा- गावातील नागरिकांची मागणी

देसाईगंज तालुक्यातील रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करा- गावातील नागरिकांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-तालुक्याच्या तुलनेत इतर तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे जोमाने सुरू आहेत. सध्या स्थितीत देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये बऱ्याच प्रमाणावर यंत्रणा स्तर व ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजूर वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.कित्येक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असणारा मजूर वर्ग हाताला काम नसल्याने घरी बसून आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे.हल्ली रब्बी हंगाम सुरु असून शेतीची कामे तोंडावर आली असल्याने रोजगार हमीची कामे सुरू केली गेली तर मशागत करण्याकरिता काही प्रमाणात हातभार लागणार असल्याचे गावातील मजूर वर्गांचे म्हणणे आहे.पूर्वी यंत्रणा स्तरावरील रोजगार हमी योजनेची कामे भरपूर प्रमाणावर केली जायची मात्र सध्या स्थितीत यंत्रणा स्तराला रोजगार हमीची कामे करण्यास ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.रोजगार हमी योजने अंतर्गत एका कुटुंबाला १०० दिवस रोजगार पूरविण्याची हमी व तशी कायद्यामध्ये तरतूद केली गेली आहे.मात्र काही जणांच्या ढिसाळ कारभारामुळे “रोजगाराची हमी, कामाची कमी”असल्याचे दिसून येत आहे.पाहिजे त्या प्रमाणात कामे उपलब्ध केली जात नाही.कामाची कमी असे होऊ नये व गावातील मजूर वर्गांच्या कामाची निकड लक्षात घेता रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करण्यात यावी.अशी मागणी देसाईगंज तालुक्यातील मजूर वर्ग व गावातील नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!