- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी उड्डाण पुलावरून गोरेगावकडे जाणाऱ्या युवकाच्या गळ्यात नॉयलॉन मांजा अडकल्याने गळा कापल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन उड्डाण पुलावरच पडल्याची घटना मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल,सोमवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली.
शुभम जियालाल चौधरी वय २४ वर्षे,गोरेगाव जि. गोंदिया असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
शुभम हा सायंकाळी आपल्या दुचाकीने भंडाराकडून गोंदियाकडे जात असतांना उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली.अज्ञात इसमाची पतंग तुटल्याने उड्डाण पुलावर अडकून पडलेला नायलॉन मांजाचा फास त्याच्या गळ्याला बसला.त्यामुळे रक्तवाहिनी कापली जाऊन प्रचंड रक्तस्राव झाला.यामुळे तो वाहनासह पुलावरच पडला.पुलावरून जाणाऱ्या काही दुचाकीस्वारांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर नागरिकांनी त्याला लाखनीतील ग्रामीण रुग्णालयात नेले.तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक चिमणे यांनी त्याच्यावर उपचार करून टाके लावले.मात्र,रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविण्याची तयारी केली.दरम्यान,त्याच्या ओळखीतील काही व्यक्ती रुग्णालयात पोहोचले.त्यांनी खासगी वाहनाने शुभमला उपचारासाठी भंडारा शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
- Advertisement -

