Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा बौद्ध समाज बांधवांच्या पुढाकाराने प्रेमी युगुल विवाह बंधनात...

कोंढाळा बौद्ध समाज बांधवांच्या पुढाकाराने प्रेमी युगुल विवाह बंधनात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील बौद्ध समाज बांधवांच्या पुढाकारातून  प्रेमी जोडप्यांचा विवाह आज,सोमवार १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांसमक्ष राहुल बौद्ध विहार या ठिकाणी पार पडला.ईश्वर रामटेके वय ३१ वर्षे रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे वर मुलाचे नाव असून करीना वेलादी वय १९ वर्षे रा.बीडरी पो.बुर्गी ता.एटापल्ली जि.गडचिरोली असे तरुणीचे नाव आहे.
प्रेमी जोडप्याचे एकमेकांवर प्रेम होते.मात्र,मुलीच्या घरच्यांकडून विरोध होत असल्यामुळे त्यांनी आज,कोंढाळा येथील बौद्ध समाज बांधव कमिटीकडे लग्न लावून देण्यासाठी आग्रह धरला होता.दोघांच्याही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून त्यांचे लग्न आज १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहुल बौद्ध विहारात लावून देण्यात आले.यावेळी राहुल बौद्ध समाजाचे अध्यक्ष शिशुपाल वालदे,सचिव गुरुदास बन्सोड,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,उपसरपंच गजानन सेलोटे, आम्रपाली बौद्ध महिला मंडळ समाजाच्या अध्यक्षा पुष्पा धाकडे,
बौद्ध उपासक,उपासिका तथा गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!