Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-आरमोरी मार्गाच्या दुरुस्तीसाठी नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडाचे निर्देश...

गडचिरोली-आरमोरी मार्गाच्या दुरुस्तीसाठी नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडाचे निर्देश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची ओळख निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग,उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभाग आदी सर्व यंत्रणांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,शुक्रवारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढाव्या बैठकी प्रसंगी दिल्या.
बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव,सहाय्यक अधीक्षक अभियंता सुमीत मुंदडा,वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम,तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्गावर अपघात टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार स्पीड ब्रेकर लावणे, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे,वाहतुकीत अडथळे ठरणारे रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.यासोबतच जिल्ह्याच्या सीमेवर ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवीण्याचे सांगितले.बैठकीत गडचिरोली ते आरमोरी मार्गाच्या दुरुस्तीच्या अडचणींबद्दल चर्चा करण्यात आली.जिल्हाधिकारी पंडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला गडचिरोली-आरमोरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!