Saturday, August 1, 2026
Homeगोंदियादुचाकी स्वाराचा भीषण अपघात; ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचे मुंडके धडापासून वेगळे..

दुचाकी स्वाराचा भीषण अपघात; ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचे मुंडके धडापासून वेगळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-देवरी-चिचगड मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचे मुंडके धडापासून वेगळे झाले असल्याची घटना काल,सोमवारी ६ जानेवारीला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सालई गावाजवळ  घडली. दरम्यान,अपघातात दुचाकीस्वाराचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याने हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.निकेश आत्माराम कराडे वय ३२ वर्षे रा.मोहगाव,ता.देवरी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
माहितीनुसार,निकेश हा काल सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याच्या दुचाकी क्रमांक-एमएच ३५ एव्ही २९६८ ने देवरीवरून आपल्या गावाकडे जात होता.दरम्यान,सालईजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला.या अपघातात निकेशचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते.त्यामुळे हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.या घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली.अपघात घडला त्या मार्गावरून अपघाताच्या काही वेळापूर्वी एक ट्रॅक्टर टिनाचे पत्रे आणि लोखंडी सळाखी घेऊन जात होता असे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी देवरी पोलिसांना सांगितले.या माहितीवरून आणि सीसीटीव्ही कॅमरेच्या फुटेजवरून पोलिसांनी त्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.याप्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!