- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पॉपकॉनची चवच लय न्यारी..! असे म्हणीत देशात लोकं पॉपकॉन मोठ्या आवडीने खातात.अशातच जे पदार्थ आवडीने खातात, त्यांच्यावरच तीन प्रकारचे जीएसटी लादण्यात येत असेल तर..असाच प्रकार हल्ली उघडकीस आल्याने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉनवर लावलेला तिहेरी जीएसटी सध्या देशभरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. निरनिराळ्या प्रकारच्या पॉपकॉनवर ५ टक्के,१२ टक्के आणि १८ टक्के जीएसटी लागणार आहे.एकाच वस्तूवर तीन प्रकारचे कर कां?असा सवाल करत नेटकऱ्यांनी पॉपकॉनवर जीएसटी ट्रोल केला आहे.
माजी मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन म्हणाले की,ग्लोबल डेटानुसार २०२५ मध्ये पॉपकॉनमधून १ हजार ७०० कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्यास १८ टक्के जीएसटी नुसार ३०० कोटी रुपयांचा कर मिळेल.२०२५च्या एकूण जीएसटी उदिष्टाच्या केवळ ०.०१३ टक्के हा कर असेल.विना लेबल,विना पॅकिंग मीठ,मसाल्याचे पॉपकॉर्न – ५%,पॅकिंग आणि लेबलिंग असणारे पॉपकॉर्न-१२% कॅरेमल पॉपकॉर्नवर-१८ % जीएसटी लादण्यात आला आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या तिहेरी जीएसटीचे समर्थन करत त्यांनी स्पष्ट केले की,अनेक राज्यात मीठ लावलेले किंवा कॅरमल लावलेले किंवा साधे पॉपकॉन नमकीन म्हणूनच विकले जाते.जेव्हा की कॅरेमल युक्त पॉपकॉनमध्ये साखर असते आणि सारख असल्यास जीएसटी बदलतो.नेटकरी या तिहेरी जीएसटीवर पॉपकॉनवर तुटून पडावे,असेच तुटून पडले आहेत.अजून जीएसटी परिषदेची नजर मुंबईच्या वडापाव आणि सॅण्डविचवर कशी पडली नाही? असा सवाल काहींनी केला.मुंबई सॅण्डविच,पाणीपुरी, डोसा,इडली,पोहा अशी यादीही काहींनी दिली.चिकन पॉपकॉर्नवर जीएसटी कसा नाही असा कुत्सित सवाल काहींनी केला आहे.सितारामन बाईंचा काही भरोसा नाही…त्या उद्या फुकटच्या हवेवर आणि सुर्यप्रकाशावरही टॅक्स लावतील असा टोला काही नेटकऱ्यांनी हाणला. मुरमुरा आणि पोहे हे तर एकाच तांदळाचे दोन पदार्थ त्यांनाही आणा जीएसटीखाली असेही एकाने सुचवले. आता मुंबईचा वडापाव तेवढा बाकी आहे… उद्या या सीतारामनबाई हवेवरही टॅक्स लावतील…पोहे काय अन् मुरमुरे काय,तांदळाचेच ! तेही आणा जीएसटीखाली…या तिहेरी जीएसटीवर भन्नाट मीम्स सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम,एक्स पोस्टवर व्हायरल होत आहेत.
- Advertisement -

