Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षल्यांनी खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाचे अपहरण करून केली हत्या...

नक्षल्यांनी खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाचे अपहरण करून केली हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका व्यक्तीस आठवडी बाजारातून उचलून नेत हत्या केल्याची घटना छत्तीसगडच्या विजापूरमध्ये
दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.नक्षल्यांनी हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून दिले.मृतदेहाजवळ नक्षल पत्रकेही सापडल्या आहेत.नक्षलवाद्यांनी एका महिन्यात ७ जणांची हत्या केली आहे.हे प्रकरण गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील रेड्डी गावातील आहे.मुकेश हेमला असे मृताचे नाव असून तो रेड्डी गावातील रहिवासी होता.गांगलूर एरिया कमिटीचे ४ ते ५ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.त्यांनी एक दिवसापर्वीच त्याला आठवडी बाजारातून उचलून नेले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुकेशचा मृतदेह सापडला.एकट्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात ५ डिसेंबर ते १३ डिसेंबर या ९ दिवसांत नक्षलवाद्यांनी एकूण ६ जणांची हत्या केली. त्यामध्ये भाजपाच्या ३ कार्यकर्त्या,एक अंगणवाडी मदतनीस आणि २ ग्रामस्थांचा समावेश आहे.सीजी राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत माओवाद्यांनी एकूण १८०० लोकांची हत्या केली आहे.गृहमंत्री म्हणाले,रक्तरंजित खेळ चुकीचा आहे; छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले की,ही संख्या आम्ही मोजत आहोत.बस्तरच्या जंगलात नक्षलवादी असंख्य निष्पाप लोकांची हत्या करीत आहेत.हा रक्तरंजित खेळ चुकीचा आहे; हे करू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!