Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... आजपासून डिसेंबरचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु... ...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी… आजपासून डिसेंबरचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु… – किती मिळणार रक्कम १५०० की २१००…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत पाच हप्त्यांची रक्कम म्हणजेच ७५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच सहावा हप्ता कधी मिळणार,याची आतुरतेने वाट बघणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची अखेर प्रतीक्षा संपली असून आज,मंगळवार २४ डिसेंबर पासून डिसेंबरच्या सहाव्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीने निवडणूक जिंकताच व सत्ता स्थापन होताच २१०० देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार आता २१०० मिळणार की, १५०० रुपये मिळणार अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. दरम्यान,आता सहावा हप्ता हा १५०० रुपये प्रमाणेच मिळणार आहे.तर २१०० रुपये अर्थसंकल्पीय तरतूद व त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मिळणार आहे.तत्पूर्वी डिसेंबरचा हप्ता दोन टप्प्यांत मिळणार आहे.पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात १५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत.डिसेंबरच्या हप्त्यासाठी ३५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!