- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका व्यक्तीस आठवडी बाजारातून उचलून नेत हत्या केल्याची घटना छत्तीसगडच्या विजापूरमध्ये
दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.नक्षल्यांनी हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून दिले.मृतदेहाजवळ नक्षल पत्रकेही सापडल्या आहेत.नक्षलवाद्यांनी एका महिन्यात ७ जणांची हत्या केली आहे.हे प्रकरण गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील रेड्डी गावातील आहे.मुकेश हेमला असे मृताचे नाव असून तो रेड्डी गावातील रहिवासी होता.गांगलूर एरिया कमिटीचे ४ ते ५ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.त्यांनी एक दिवसापर्वीच त्याला आठवडी बाजारातून उचलून नेले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुकेशचा मृतदेह सापडला.एकट्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात ५ डिसेंबर ते १३ डिसेंबर या ९ दिवसांत नक्षलवाद्यांनी एकूण ६ जणांची हत्या केली. त्यामध्ये भाजपाच्या ३ कार्यकर्त्या,एक अंगणवाडी मदतनीस आणि २ ग्रामस्थांचा समावेश आहे.सीजी राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत माओवाद्यांनी एकूण १८०० लोकांची हत्या केली आहे.गृहमंत्री म्हणाले,रक्तरंजित खेळ चुकीचा आहे; छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले की,ही संख्या आम्ही मोजत आहोत.बस्तरच्या जंगलात नक्षलवादी असंख्य निष्पाप लोकांची हत्या करीत आहेत.हा रक्तरंजित खेळ चुकीचा आहे; हे करू नये.
- Advertisement -

