Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची परवानगी शाळेला......

आता इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची परवानगी शाळेला… – शालेय शिक्षण सचिव संजय कुमार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षणाचा शैक्षणिक दर्जा सुधारणे ही काळाची गरज झाली आहे.सध्याचे शिक्षण काठावर पासच नाही तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला जंग चढविण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी रात्रंदिवस मूकपाट अभ्यास करून परीक्षा देण्यात येत होत्या.कुठलेही फुकटचे मार्क वा इतर पासिंग ग्रेस दिले जात नव्हते; त्यामुळे विद्यार्थ्यांची तेज,तल्लख बुद्धी तसेच स्मरणशक्ती वाढून एक वेगळाच विद्यार्थी घडायचा; अशातच आता केंद्र सरकारने मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम,२०१० मध्ये सुधारणा केली आहे.यामध्ये सरकारने नियमित परीक्षांसाठी तरतुदी आणल्या आहेत.इयत्ता ५ वी आणि ८ वी मधील विद्यार्थ्यांना नापास करण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे.१६ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या नवीन “मुक्त सक्तीच्या बालशिक्षण दुरुस्ती नियम २०२४” अंतर्गत,इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी नियमित सक्षमता-आधारित परीक्षा आयोजित केल्या जातील.जर एखादा विद्यार्थी परीक्षेत पास झाला नाही,तर सदर विद्यार्थ्याला निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी दिली जाईल.तथापि,पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्गात परत ठेवण्यात येईल.आज,सोमवारी २३ डिसेंबरला पत्रकारांशी बोलतांना शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी नमूद केले की,नवीन नियम शैक्षणिकदृष्ट्या मजबूत नसलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देतांना शैक्षणिक परिणाम सुधारण्यास मदत करतील.तसेच इयत्ता ८ वी पर्यंत कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही,विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास,शिक्षक त्यांना दोन महिन्यांच्या अतिरिक्त सूचना देतील आणि केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्येच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!