Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगडचिरोलीचे पालकमंत्री पद नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही; तर तेथील मलिंदा खाण्यासाठी... -...

गडचिरोलीचे पालकमंत्री पद नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही; तर तेथील मलिंदा खाण्यासाठी… – संजय राऊत यांचा घणाघात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गडचिरोलीचे पालकमंत्री पद नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही; तर तेथील मलिंदा खाण्यासाठी हवे असते;अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी आज,सोमवारी २३ डिसेंबरला सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीत पालकमंत्री पदावरून असलेल्या वादावर भाष्य केले.तसेच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरून सरकारला सवाल केला.स्वतःच्या फायद्यासाठी पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे.
फक्त सत्ता आपल्या हाती असावी,या भागात होणारे आर्थिक व्यवहाराची सूत्र आपल्या हाती असावी म्हणून पालकमंत्र्यांवरून वाद आहे.गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवे असते,मात्र,ते काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नको असते.तर गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत,कोट्यावधी रुपयांचे उद्योग आहेत,तिथून मलिंदा मिळवा; त्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद हवे असते,अशी टीका संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केली आहे.गडचिरोली,चंद्रपूर भागात वनसंपत्तीचा नाश सुरू आहे.त्याचा वाटा आपल्याला मिळावा यासाठी तेथील पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असतेच,असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
कुणाला बीडचे पालकमंत्री पद मिळाल्याने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का?
परभणीचे पालकमंत्री पद कोणाला मिळाले तर पोलिस पोलीस कोठडीत हत्या झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल करत मुंबई,उपनगर आणि ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत घमासान सुरू आहे.कल्याणमध्ये एखाद्याला पालकमंत्रीपद मिळाले,तर तेथील मराठी माणसावर अन्याय झाला,तो भविष्यात दूर होणार आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!