Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोलीनिराधारांच्या बाबतीत तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार.. - तीन महिन्यांपासून निराधारांचे मानधन रखडले..

निराधारांच्या बाबतीत तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार.. – तीन महिन्यांपासून निराधारांचे मानधन रखडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-तीन महिन्यांपासून निराधारांचे मानधन रखडल्याने मानधनावर जीवनयापन करणाऱ्या गरीब, गरजू,निराधारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार,इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ,तसेच राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत, वृद्ध,अपंग,दिव्यांग,अविवाहित महिला, विधवा, घटस्फोटित,परित्यक्ता,कुष्ठरोगी,निराधार,दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांचे अनुदान तीन महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातील दीनदुबळे, मागासवर्गीय,विमुक्त आणि भटक्या जाती, जमाती,इतर मागासवर्गीय,वृद्ध,दिव्यांग,अविवाहित, क्षयरोगी, घटस्फोटीत,परित्यक्ता,कुष्ठरोगी,एड्स व्यक्तींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.मात्र,लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांपासून अनुदानच जमा झाले नाही.विधानसभा निवडणुकीनंतर मानधन जमा होईल,अशी अपेक्षा होती. परंतु,अद्याप त्याबाबत काहीच झालेले नाही.सरकारने लाडकी बहीण योजनेचे अनुदान हिवाळी अधिवशेन संपताच जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान,निराधारांच्या बाबतीत तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत आहे.आपल्याला चार पैशांचा आधार मिळेल, या अपेक्षेने निराधार महिला-पुरुष कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे मारत आहेत.मात्र,तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा न झाल्याने अनेकांवर उसनवारीची वेळ आली आहे.आधीच तुटपुंजे अनुदान अन् तेही महिनोमहिने मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस...

सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून पंप संचावर ९० टक्के तर पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान.. – शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील निवड झालेल्या ५३२ गावांतील अनुसूचित जाती(SC)व अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(पोकरा)अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी...

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!