- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):- ‘पेम हे प्रेम असते यात सर्वकाही सेम असते’ एकदा का प्रेमात पडले की,सारे रान मोकळे असते’ असे उगीचच म्हटले जात नाही. सुरुवातीला कुठल्याही आई-वडिलांचा प्रेम विवाहास विरोध असतोच,मात्र,सुखी संसाराची गाणी वाजू लागली की,सर्वजण आपलेसे वाटू लागतात.अशातच प्रकारे ३० वर्षीय युवक व २५ वर्षीय युवतीचे बऱ्याच कालावधीपासून एकमेकांवर प्रेम होते.मात्र,मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे,प्रेमीयुगलांनी ब्रम्हपुरी तालुक्याच्या खरकाडा (रणमोचन) गावातील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचे पदाधिकारी व तंटामुक्ती समीतीला लग्न लावून देण्यासाठी अर्ज केले.त्याआधारे मंदीर व तंटामुक्त समीतीने पुढाकार घेत प्रेमीयुगलाचा विवाह लावून दिला आहे.
सचिन नखाते वय ३० वर्षे,रा.पिंपळगाव,भोसले असे वराचे नाव आहे,तर राखी तलमले वय २५ वर्षे,रा. उदापूर,ब्रम्हपुरी असे वधूचे नाव आहे.दोघेही विवाहाबद्ध प्रेमीयुगल,ब्रम्हपुरी तालुक्यातील रहीवासी असून मुलीच्या घरच्याकडून लग्नाला विरोध असल्याने त्यांनी खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमेटी व तंटामुक्त गाव समिती यांच्याकडे लग्न लावून देण्याची विनंती केली.
त्यानुसार ज्योतिर्लिंग महादेव मंदिर समिती खरकाडा, यांनी रितसर कागदपत्रांची पडताळणी करून लग्न लावून दिले.याप्रसंगी खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष रवींद्र ढोरे, सचिव योगेश्वर ढोरे,उपाध्यक्ष राजेश्वर पारधी, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष तुकाराम ठाकरे,गावातील महिला-पुरुषांसह अन्य मान्यवर लग्न समारंभाला उपस्थित होते.
- Advertisement -

