- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-अवैध वाळूची वाहतूक प्रकरणी कारवाई करून देसाईगंज तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेला टीप्पर चक्क तहसील कार्यालयातूनच पळवून नेण्यात आल्याची घटना २९ नोव्हेंबर २०२४ ला उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.घटनेमुळे जणूकाही वाळू चोरांचा माफियाराजच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशातच तालुक्यातील विविध प्रसार माध्यमांनी सदर घटनेची दखल घेत उचलबांगडी केली.त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आणि तब्बल १२ दिवसांनी देसाईगंज तहसील कार्यालयातून पळवून नेण्यात आलेला टीप्पर अखेर तहसील वापसी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की,अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक संबंधात मागील महिन्याच्या दिनांक-२८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९.०७ च्या सुमारास ८ ब्रास अवैध वाळूची वाहतूक प्रकरणी कोंढाळा-मेंढा घाट रस्त्यावरून पकडण्यात आलेला टीप्पर क्रमांक-एमएच ४० सीटी ९८९१(MH 40CT9891) देसाईगंज तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता.८ ब्रास अवैध वाळू वाहतूक प्रकरणी देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार विलास तुपट यांनी मंडळ अधिकारी,ग्राम अधिकारी,ग्राम महसूल सेवक तसेच अव्वल कारकून यांच्या समक्ष कारवाई केली व तहसील कार्यालयाच्या आवारात टीप्पर ठेवण्यात आला होता.मात्र,जमा केलेला टीप्पर दुसऱ्याच दिवशी गायब झाल्याने शंकांना पेव फुटले होते.त्यामुळे घडलेला प्रकार लक्षात येताच विविध प्रसार माध्यमांनी उचलून धरले आणि तब्बल ११ ते १२ दिवसांनी टीप्पर तहसील वापसी झाल्याने देसाईगंज महसूल प्रशासन आता काय कारवाई करतात,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
- Advertisement -

